धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे प्रथमच मोफत वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातीसह राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी सकाळी अकरा वाजता धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालय येथे करण्यात आल्याची माहिती संयोजक विठ्ठल खरे यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमास आशिर्वाद देण्याकरिता काशीपिठाचे जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी व श्री.ष.ब्र.108 शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील हे असणार आहेत. यावेळी मा.खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, उद्योजक शंकरराव बोरकर ,माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, भाजपचे नेते नितीन काळे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे,हनुमंत भुसारे, गुरुनाथ बडूरे, राजेंद्र मुंडे,श्रीकांत साखरे, रेवणसिद्ध लामतुरे, बाळासाहेब पाटील, सातलिंग स्वामी, भागवत हिंगमिरे, डॉक्टर एल एन स्वामी, प्रफुल्ल शेटे, युवराज नळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या मेळाव्यामध्ये वीरशैव समाजातील सर्व पोट जातीतील वधू वर सहभागी होणार आहेत तरी या मेळाव्याचा वधू-वर पालकांनी लाभ घ्यावा असे आव्हान  विठ्ठल खरे यांनी केले आहे. यावेळी राजेश बिराजदार, विजय लगदिवे, एस.वाय. बिराजदार, महादेव लिंगे, सतीश माळी, निवृत्ती कुदळे .नामदेव खरे .प्रदीप म्हेत्रे, सोमनाथ बेलूरे, परमेश्वर राऊत, सुहास मंडगे,उमेश स्वामी,अशोक मनसुके, आदी उपस्थित होते.

 
Top