धाराशिव (प्रतिनिधी)- नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे दर वर्षी नीट परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये यावर्षी देशभरातील 4,750 केंद्रावर 24 लाख 6079 विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 31,297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  यामध्ये यावर्षी 720पैकी 720 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही  67 एवढी आहे. मात्र खरा असंतोष व भीती यामध्ये आहे की, एका सेंटरवर एकापाठोपाठ बसलेल्या 07 विद्यार्थ्यांना सारखेच म्हणजे 720 पैकी 720 गुण आहेत. त्यामुळे या परीक्षेत काही काळाबाजार झाला आहे काय अशी शंका सध्या पालक व विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे या गोष्टीची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाचा अधिपत्याखाली व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी एका निवेदनाद्वारे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे केली आहे.

 
Top