कळंब (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व शिक्षकांचे जिल्हास्तरीय सर्व प्रश्न चालू जुन महिना अखेर पर्यंत सोडवले जातील असे  आश्वासन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने धाराशिव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी  अधिकारी मैनाक घोष यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शाळा व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी विषय वाईज सर्व प्रश्न जाणून घेऊन चर्चा केली. त्यात प्रामुख्याने शासन परिपत्रकाप्रमाणे गैरसोईच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या व न्यायालयीन आदेश असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या कराव्यात, 12 व 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना अनुक्रमे वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीचा लाभ देण्यात यावा. मुख्याध्यापक पदोन्नती व प्राथमिक पदवीधर शिक्षकांना दर्जावाढ देऊन रिक्त पदे भरावीत. निवेदनातील  वरीष्ठ वेतनश्रेणीची प्रकरणे, मुख्याध्यापक पदोन्नती, प्राथमिक पदवीधर शिक्षक दर्जावाढ, विनंती अर्ज दिलेल्या शिक्षकांना पदावनत करणे,माझी शाळा सुंदर शाळा मुल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मानधन ,100टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याबाबत या जून महिना अखेर पर्यंत कार्यवाही करण्यात येईल व लोहारा लेखाधिकारी यांच्याकडुन खुलासा मागवला जाईल असे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह राज्य चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे , जिल्हासंघटक धनाजी मुळे,जिल्हा पतसंस्थेचे अध्यक्ष शेषेराव राठोड,तालुकाध्यक्ष धाराशिव राहुल भंडारे,तालुकाध्यक्ष कळंब  दत्तात्रय पवार, तालुकाध्यक्ष लोहारा सुदर्शन जावळे,जिल्हाप्रवक्ता उमेश भोसले, कार्याध्यक्ष कळंब प्रशांत घुटे, संघटक बालाजी पडवळ,चंद्रकांत शिंदे,सुनिल अहिरे, माधव बोधले ,धनराज नेलवाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top