भूम (प्रतिनिधी)-भूम तालुका पत्रकार संघाच्या नावाने अधिकृत शासन दरबारी नोंदणी करत असणारे पत्रकार संघ स्थापन केला आहे. या संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. अशा नूतन पत्रकार संघाचे अध्यक्षपदी धनंजय शेटे यांची नियुक्ती झाली आहे. तर सचिव पदी गौस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अजित बागडे, सदस्य आशिष बाबर, अरविंद शिंदे, अरुण देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सौ कमल घुले फाउंडेशनचे सर्वेसर्वा राहुल घुले यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार संघाच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत सर्वांचा सन्मान सत्कार केला.

 
Top