भूम (प्रतिनिधी)-येथील जिल्हा परिषद हायस्कूल भूमचा निकाल सलग 8 व्या वर्षी 100% टक्के लागला आहे . 1950 साली स्थापन झालेली ही शहरातील सर्वात जुनी शाळा आहे . शाळेचा भूतकाळ गौरवशाली आहे. प्रशालेतून प्रथम क्रमांक अंकिता नामदेव कांबळे 82 .40% द्वितीय कमांक आरती अशोक क्षीरसागर व ज्ञानेश्वरी श्रीराम कसबे  82 .00 % तृतीय क्रमांक ऐश्वर्या सतिश क्षीरसागर 81 .00 % प्राप्त केले आहेत.  खेड्यातून ये -जा करून सदरील विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यशस्वी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेवर जीवापाड प्रेम करणारे माजी मुख्याध्यापक सोमनाथ गुंजाळ तसेच मुख्याध्यापक तात्या कांबळे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब औताडे व उपाध्यक्ष ॲडव्होकेट विठ्ठल खवले यांच्या हस्ते पुष्पहार ,पुस्तक व पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रशालेतील पवार के. सी. ,पाटील डी. जी., पायघन यु. पी., पवार बी. एस., जोशी ए. टी., गुंजाळ डी. एस.,  श्रीमती विधाते व्ही. आर., सुनील जाधवर, हरीश साठे, झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गुंजाळ डी एस यांनी तर आभार प्रदर्शन जोशी यांनी केले.

 
Top