धाराशिव (प्रतिनिधी) - येथील फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिव मधील तीन विद्यार्थ्यांनी ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम 2024 लेवल टू मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टॉप टेन मध्ये विशेष स्थान मिळवले आहे. ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम 2023 मध्ये फ्लाईंग किड्स मधून एकूण 119 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. त्यातून 114 विद्यार्थ्यी पुढील नेक्स्ट लेवल एक्झामसाठी पात्र ठरले आहेत. 

तसेच शालेय स्तरावरील ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड 2023 मध्ये 08 विद्यार्थी गोल्ड मिडल मेडल, 11 विद्यार्थी सिल्व्हर मेडल तर 3 विद्यार्थी ब्राँझ मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले होते तर, ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम 2024 च्या द्वितीय पातळीवर तर चक्क तीन विद्यार्थ्यांनी टॉप टेन मध्ये नाव मिळवले आहे. इयत्ता तिसरीची विद्यार्थीनी आरोही साळुंके हिने अंतरराष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक मिळवला, तर इयत्ता सहावीची  विद्यार्थीनी आरोही पेंदे हिने सातवा क्रमांक, तर आठवीची विद्यार्थीनी वल्लभी कांबळे हिने नववा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय प्रावीण्याशह उत्तीर्ण झाले असून, उर्वरित 111 परीक्षेत पात्र ठरले आहेत.  एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाडच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना  विशेष भेटवस्तू देत प्रशस्तीपत्र व उत्तीर्ण सर्वांना प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. 

सदरील ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम 2024 मधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व माध्यामातून कौतुक पाहायला मिळत आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व पातळीवरून कौतुक होत आहे. आ. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील व सरचिटणीस  प्रेमाताई सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य  पाटील, विद्यालयाचे संचालिका डॉ. मंजुळा आदित्य पाटील व विद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी व सर्व शिक्षक - शिक्षिका वर्ग तसेच समस्त पालकांकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.


 
Top