धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये सामाजिक न्याय दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी प्रथम छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन केले. तर आपल्या छोट्या खानी भाषणात त्यांनी सांगितले की  पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा असलेला त्यांचा सिंहाचा वाटा व भारतातील आरक्षण निर्मितीचे शिल्पकार म्हणून केलेले कार्य प्रशंसनीय असेच आहे . हे सांगून त्यांच्या चरित्राचा धावता आढावा त्यांनी यावेळी घेतला.

यावेळी उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी. गुंड तर सुनील कोरडे व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.जी .साळुंके यांनी केले . या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची समता रॅली शहरातून काढण्यात आली.

 
Top