धाराशिव (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 26 जून रोजी बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक धाराशिव येथे विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.

धाराशिव शहरात रक्ताचा पुरवठा कमी असल्यामुळे अनेक युवकांनी जयंतीनिमित्त रक्तदान केले. यावेळी पत्रकार, शेतकरी, दिव्यांग, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार स्मारक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी स्मारक समितीचे मार्गदर्शक धर्मवीर कदम, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मारक समितीचे सचिव बालाजी तांबे यांनी केले. या कार्यक्रमास शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्निल शिंगाडे, डॉ. प्रतापसिंह पाटील, सुरज साळुंके, अमरसिह देशमुख,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बी.जी अरवत,समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप, रवि माळाळे, संतोष जाधव, राजसिंह राजेनिंबाळकर, विष्णू इंगळे, रोहित पडवळ, शीला उंबरे, रोहित निंबाळकर,लक्ष्मण माने, आकाश तावडे, रवी कोरे, संकेत सूर्यवंशी ,मसुद शेख, अजित गुंड, ॲड. तसलीम काजी, उमेश राजेनिंबाळकर,प्रा. अभिमान हंगरगेकर, दलित मित्र शंकर खुणे, मयूर काकडे, सोमनाथ गुरव, आदीसह शाहू महाराज प्रेमी नागरिक तसेच पोद्दार इंग्लिश स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार रोहित पडवळ यांनी मानले.

 
Top