धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद  व रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मार्फत रोटरी की आशा या उपक्रमा अंतर्गत व डिस्ट्रिक्ट ग्रँट मधून तीन एकल गरजू महिलांना  स्वावलंबी बनविण्यासाठी 2 एचपी क्षमतेच्या, ताशी 25 किलो धान्य, मसाला बनवता येईल अशा कमर्शियल ऑटोमॅटिक आटा चक्क्यांचे वाटप करण्यात आले.

रोटरी की आशा या कार्यक्रमा अंतर्गत  गरजू लाभार्थ्यांना व्यवसाय चालू करून आपली उपजीविका चालवता यावी आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी या करिता शोभा रुद्राप्पा हुल्ले, उषा बाळू मगर, वनमाला राजेंद्र कांबळे या तीन लाभार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद च्या अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ. मीना जिंतूरकर यांच्या हस्ते ऑटोमॅटिक इलेकट्रीक पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा प्रांतपाल रो. रवींद्र साळुंके, सौ. रेखा पिंपळे व रोटरी सदस्य उपस्थित होते.

 
Top