तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर  महाव्दारांसमोर  अतिक्रमण करुन मोठ्या प्रमाणात  दुचाकी लावल्याने भाविकांना मंदिरात ये-जा करणे कठीण बनले होते. या पार्श्वभूमीवर नगर परिषद अतिक्रमण पथकाने मंदिरसमोर उभ्या केलेल्या दुचाकीवर कारवाई करुन पोलिस ठाण्यात नेण्यात आल्या. या पथकाने पाठ फिरवताच पुनश्च येथे दुचाकी महाव्दारांसमोर लावल्या गेल्या. हा पाठशिवणीचा खेळ अतिक्रमण हटाव मोहीमे दरम्यान चालु आहे.

रविवारी दि.16 जून रोजी मंदीर महाद्वार समोर दुपारी दुचाकी हटवल्या. अतिक्रमण हटाव पथक तेथुन जाताच पुन्हा पुन्हा होत असल्याने हा प्रकार म्हणजे दिखावा असल्याने मंदीर परिसर कायम स्वरुपी अतिक्रमण मुक्त होण्यासाठी आता वरिष्ट अधिकारी वर्गाने जातीने लक्ष घालणे गरजेचे बनले आहे. मंदीर परिसरात काहींनी अतिक्रमणे केले. या अतिक्रमण माध्यमातून लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. काही सजग नागरिकांनी मंदीर समोरील अतिक्रमण माध्यमातून लाखो रुपये उलाढाल होत असल्याने अतिक्रमणे काढा अशी शहरवासियांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन मागणी देवुन केली आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुट्यांच्या दिवशी हमखास गर्दी असते. सध्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. तसेच अतिक्रमणे यांची संख्या वाढत चालली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर अतिक्रमण करून आपला व्यवासाय थाटला आहे. काही अतिक्रमण धारक तर वर्षभरापासुन अनिधिकृतपणे अतिक्रमण करुन व्यवसाय थाटात मांडला आहे. मंदिरात जाताना व येताना भाविकांना या अतिक्रमणामुळे  मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी महाद्वार समोर असलेले हे अतिक्रमणे सीसीटीव्ही फुटेज पाहुन हटवावेत किंवा मोठा दंड करा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


 
Top