धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकरी वर्गाला पीक कर्ज नूतनीकरण व्याज परतावा तसेच शासनाच्या विविध प्रोत्साहन पर योजनेचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी व त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक तर्फे महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रेस छत्रपती संभाजी नगर येथून दिनांक 05 जून 2024 पासून प्रारंभ झालेला आहे.

दिनांक 11 व 12 जून 2024 दरम्यान ही यात्रा धाराशिव-लातूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिराढोण, भूम, आनाळा व परांडा या ठिकाणाहून जनजागृती करणार आहे. बँकेच्या योजना, शेतकरी योजना, शेतकरी सन्मानासह इतर माहिती देण्यासह वृक्षारोपनाचे उपक्रम राबविले जाणार आहेत. ही यात्रा पाच जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सुरू होऊन दोन वेगवेगळ्या मार्गाने नांदेड या ठिकाणी एकत्र येणार असून 15 जूनला नांदेडला समारोपाचा कार्यक्रम घेण्यात येईल. एक टीम छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली व नांदेड तसेच दुसरी टीम छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव - लातूर ते नांदेड या मार्गाने मार्गक्रमण करणार असून त्या दरम्यान एटीएम मशीनचे प्रात्यक्षिक तसेच आर्थिक समावेशन, डिजिटल साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजना बद्दल जनजागृती करण्याचे काम देखील बँकेमार्फत करण्यात येईल.

या यात्रेचे 11 जून 2024 रोजी बँकेच्या धाराशिव - लातूर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या साई मंगल कार्यालय शिराढोण या ठिकाणी दुपारी 04:00 वाजता आगमन होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक परिवार आपल्या खातेदारांना जाहीर आवाहन करत आहे की या ग्रामीण नवचेतना यात्रेत सहभागी होऊन बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

 
Top