धाराशिव  (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील पत्रकारांच्या 10 व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुक्याच्यावतीने लवकरच करण्यात येणार आहे.

पत्रकार हा समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांचे आपल्या लेखणीतून कौतुक करतात. मात्र पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा ते सत्कार करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्यासह प्रेरणा देण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन दि. 15 जून 2024 पर्यंत तालुक्यातील पत्रकारांनी आपल्या पाल्याचे नाव नोंदणी तालुकाध्यक्ष अमजद सय्यद यांच्याकडे करावी . हा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम नाव नोंदणी झाल्यावर धाराशिव शहरात आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचे नाव व्हाईस ऑफ मीडियाकडे कळवावे. विशेष म्हणजे व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने हा पत्रकारांच्या पाल्यांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला असल्यामुळे जास्तीत जास्त पत्रकारांनी आपल्या पाल्यांसह सहकुटुंब उपस्थित रहावे आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाची तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 
Top