धाराशिव (प्रतिनिधी)- 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कारण दिवसेंदिवस पर्यावरणाविषयी परिस्थिती गंभीर बनत असून पर्यावरण पूरक वातावरणा अभावी अनेक समस्या या भयानक स्वरूप धारण करत आहेत. याच थीमवर आधारित दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आखून दिलेल्या नियमावलीनुसार वृक्षारोपण मोहीम सर्वच महाविद्यालयाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हाती घेतली होती. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या नियमावलीनुसार त्यांनी सुरू केलेल्या “मेरी लाईफ “ या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक महाविद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली. त्याचाच भाग म्हणून येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  “आमची जमीन आमचे भविष्य. आम्ही जनरेशन पुनर्संचयित आहोत “ या थीम अंतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांनी जमीन पुनर संचित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळातील लवचिकता यावर आधारित कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम केला. त्याचबरोबर संपूर्ण महाविद्यालयाच्या परिसरामधील प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक मुक्त वातावरण हाही संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, महाविद्यालयांमध्ये परीक्षेच्या माध्यमातून अनेक पेपरचा उपयोग केला जातो, परंतु भविष्यामध्ये डिजिटल परीक्षा घेण्यावर भर देण्यात येणार असून त्यामुळे पेपरलेस सोसायटीकडे आपली वाटचाल सुरू आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी होणारी अन्नाची नासाडी ,अन्न कचरा नियोजम  तसेच अनेक जैविक साधनसंपत्तीची नासाडी होत असून विद्यार्थ्यांमध्ये आत्तापासूनच जनजागृतीची आवश्यकता असल्यामुळे आम्ही या निमित्ताने अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी , कर्मचाऱ्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये  तसेच आपल्या परिसरामध्ये किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन संवर्धन करावे असेही आवाहन केले.

*तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये यापूर्वीही युनिसेफच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन विषयक अनेक उपक्रमाचे आयोजन केले असून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या वृक्षाचे वृक्षारोपण करून त्याचे सातत्यपूर्ण संवर्धन केल्यामुळे परिसर हा अत्यंत सुंदर पद्धतीने हराभरा आहे.महाविद्यालयातील 122 विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेल्फ प्लेस्ड (स्वयंगती) कोर्स पूर्ण केला आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विक्रसिंह माने होते. तसेच राबवण्यात आलेल्या उपक्रमांची जबाबदारी डॉ.एस. एन. होळंबे (कमिटी प्रमुख), प्रा. अभिजीत कदम, धनाजी जाधव, अभिमन्यू धोत्रे ,सोमनाथ कोरके, हनुमंत सुरवसे, सुरज खराडे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला व भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या वतीने  नितीन राठोड, विठ्ठल तिकांडे, सारंग चाउते उपस्थित होते.

 
Top