धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये किमान 35 जागा लढविण्यात येतील असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली.

समाजवादी पार्टीचे सर्व राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या विविध आघाडीचे प्रमुख यांचे संयुक्त बैठक मुंबई येथील बेलार्ड इस्टेट येथील समाजवादी पार्टी मुख्य कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या 37 जागा जिंकून जे यश मिळवले आणि देशांमधील पक्ष लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवला त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी यांचे अभिनंदन करण्यात आले .त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीने एकही जागा न लढविता ' संविधान बचाव तानाशाही हटाव' भूमिकेतून राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीस मदत केली .प्रभाव असलेल्या ठिकाणी प्रचंड संख्येने मतदान घडून आणले आणि महाविकास आघाडीच्या यशामध्ये वाटा उचलला. याबद्दल राज्यातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले .आगामी विधानसभा निवडणुका राज्यामध्ये निश्चितपणे सत्तापालट घडवणाऱ्या ठरतील असा विश्वास राज्य कार्यकारिणीने एकमताने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे विधानसभा मतदारसंघाबाबत तपशीलवार चर्चा झाली आणि अशा 35 विधानसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात याव्यात असा निर्णय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम अजमी या संदर्भात पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. मुंबई येथे झालेल्या या राज्य कार्यकारणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रताप होते. या बैठकीमध्ये पक्षाचे उपाध्यक्ष डॉ पी डी जोशी पाटोदेकर, प्रधान महासचिव परवेज सिद्धीकी, महासचिव डॉ अब्दुल राऊत, डॉ विलास सुरकर  राहुल गायकवाड, श्रीमती साजिदा निहाल अहमद,  कल्पना गंगवार,  इत्यादी प्रमुखांनी मार्गदर्शन केले .या बैठकीस रमेश शर्मा दीपक चिमणकर, लियाकतखान, याकूब पठाण, फैसलखान ,हैदर पटेल, जावेद खान  इब्राहिम खालिक, फारूक पाशा,  शाहराज खोसे,  एडवोकेट शिवाजी कांबळे, अफजल पठाण, रईस बागवान ,मुस्तकीन दिग्निटी ,शानहिंद निहाल अहमद, इम्रान चौधरी, साधना शिंदे, सहदेव वाळके ,दिलावर खान, विष्णू गोडबोले ,बच्चू खान ,अबू डोंगरे मुकुंद माळी, जितेंद्र सतपालकर, प्रकाश लवेकर ,कुमार राऊत इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 
Top