धाराशिव (प्रतिनिधी) - कलाविष्कार अकादमी धाराशिव द्वारा प्रतिवर्षीप्रमाणे सन 2023 - 2024 च्या इ. 10 व 12 वीच्या परिक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ करण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांना 10 व 12वी परीक्षेत 85 टक्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. अश्या विद्यार्थ्यांनी पुढील नमुद ठिकाणी दि. 25 जून 2024 पर्यंत त्रिवेणी आईस्क्रीम पार्लर राधिका सायकल मार्टच्या बाजूस समता नगर धाराशिव व एए डिझाईन सह्याद्री कॉर्नर समता नगर धाराशिव  येथे आपल्या प्रमाण पत्राची छयांकित (झेरॉक्स ) 1 प्रत देऊन आपले नाव , संपर्क क्रमांक , नोंदणी करावी असे आवाहन कलाविष्कार अकादमीचे संस्थापक अध्यक्ष युवराज नळे, रविंद्र कुलकर्णी, शरद वडगावकर, राजाभाऊ कारंडे व सर्व पदाधिकारी यांनी केले.

 
Top