धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 25 वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जिल्हा कार्यालय धाराशिव येथे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव येथे  दिनांक 10 जून रोजी पक्षाचा 25 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल पक्षाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय येथे धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. पदाधिकारी यांच्या वतीने पक्षाचा जयजयकार करून घोषणा देण्यात आल्या.  यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अरफात काझी,अल्पसंख्यांक महिला शहर कार्याध्यक्ष अमिना शेख,सोशल मीडिया धाराशिव सुहास मेटे,धाराशिव तालुका सचिव प्रताप शिंदे,केशेगाव जि.प. गटप्रमुख लिंबराज लोखंडे,आंबेजवळगाव जि. प .गटप्रमुख सुरेश राठोड तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top