कळंब (प्रतिनिधी)- चांगल्या कार्यासाठी शिक्षणाची गरज असते असे नाही. तर तिथं अंतरिक संवेद तयार होतो. तिथे आपल्याकडून कार्य घडते ज्याप्रमाणे कार्यालयामध्ये आस्थापना विभागअसतो त्या स्वरूपाचे हे कार्य असून शशीकुमार भातलवंडे गेली वीस वर्ष ध्यान योग प्राणायाम यासाठी काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी अर्चना भातलवंडे यांची मोलाची साथ आहे असे विचार अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले  यांनी पतंजली योग समितीच्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हनुमान मंदिर पुनर्वसन सावरगाव कळंब येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

तर आपल्या प्रास्ताविक भाषणात शशीकुमार भातलवंडे यांनी गेली वीस वर्ष रामदेव बाबा यांच्याकडून प्रेरणा घेऊन ध्यान, योग, प्राणायामचे नित्य वर्गातून व शाळा महाविद्यालयात प्रशिक्षण दिले असल्याचे सांगितले. पतंजली योग समिती कळंबच्याच्या वतीने दिनांक 15 मे ते 21  जून पहाटे 5 ते 7 यावेळेत योग दिनानिमित्त मोफत ध्यान, योग, प्राणायम शिबिर हनुमान मंदिर पुनर्वसन सावरगाव येथे संपन्न झाले. याप्रसंगी पतंजली योग समितीच्या वतीने हभप. प्रकाश महाराज बोधले यांचा शशीकुमार भातलवंडे यांनी सत्कार केला उपस्थित शिबिरार्थी यांच्या वतीने शशीकुमार भातलवंडे यांचा सत्कार हभप बोधले महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.  योग अभ्यासाचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक प्रा. आनंत नरवडे, अर्चना भातलवंडे, तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक गोपीचंद फावडे,  हनुमान मंदिर ट्रस्टचे रवींद्र काळे, पो.कॉ. श्रीराम मायंदे, पांडुरंग माळवदे, राजकन्या गवळी ,विजयश्री वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिबिरार्थी हभप. बळीराम महाराज कवडे, डॉ. भागवत राऊत, राजकन्या गवळी, उषा केंद्रे यांनी मनोगते व्यक्त केली. विजयश्री वाघमारे यांनी गुरु वंदना गायन केले. कार्यक्रमासाठी डी. के. कुलकर्णी, प्रकाश भडंगे, शिवाजी गिड्डे ,वनिता कटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी तर आभार महारुद्र हुंडेकरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामभाऊ बाबर,  रमेश खोसे, नितीन डांगे, वसंत भोरे ,नरसिंग नांदे ,गणपती मोराळे, शिवाजी केंद्रे ,अनिल कुलकर्णी ,डॉ. प्रदीप भिसे, संभाजी महामुनी, जयश्री बाराते, अनिता कुलकर्णी ,कुंदा हुंडेकरी यांनी परिश्रम घेतले.

 
Top