धाराशिव (प्रतिनिधी)- क्लीन समता ग्रीन समता परिवारातर्फे दरवर्षी 10 वी आणि 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या पंखांना आणखी बळ देण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत असतो.

यावर्षी यशस्वीतांच्या सन्मानासाठी, त्यांचे अभिनंदन आणि गौरव करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे माजी संचालक डॉ. कलिमोद्दिन अजीज शेख, जिल्ह्याचे प्रमुख मधुमेह तज्ञ डॉ. किरण पोतदार तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रसेन देशमुख आणि वासुदेव वेदपाठक उपस्थित होते.

शिक्षणासोबतच पर्यावरणाचे किती महत्व आहे हे वेळोवेळी क्लीन समता ग्रीन समता परिवरातर्फे जनमानसात रुजविण्यात येते. यावर्षी या सर्व गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक करत परिवाराचे मानाचे गौरवपत्र तसेच वड आणि पिंपळ या झाडांचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले.

स्वच्छ पर्यावरणासाठी सदैव आग्रही आणि तत्पर असलेल्या क्लीन समता ग्रीन समता परिवाराचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत भविष्यातही असेच समाजवादी आणि मानवतावादी कार्य चालू राहावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्याना आपल्या भावी जीवनात येणाऱ्या अडचणीचा सामना करत यशस्वी होण्यासाठी गुरुमंत्र दिला.

चीन मध्ये झालेल्या जागतिक पातळीवरील मॉडर्न पेंट्यूथान लेजर रन या स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलेल्या योगिनी उमाकांत साळुंखे (फुगारे) यांचा या कार्यक्रमामध्ये कौटुंबिक सत्कार करण्यात आला. यावेळी योगिनी यांनी शिक्षणासोबतच खेळाचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे सर्वांना सांगितले. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून तापडिया मॅडम यांनी क्लीन समता ग्रीन समता परिवाराने आजपर्यंत केलेल्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आजोयक क्लिन समता ग्रीन समता परिवाराचे अध्यक्ष तथा समता गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन नाना घाटगे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच मते यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी परिवाराचे अध्यक्ष नाना घाटगे यांनी उपस्थित मान्यवरांचे, पालकवर्गाचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यरत असलेल्या समता सोसायटी संचालक रामचंद्र जोशी, समता सोसायटीचे सचीव पकंज पडवळ, बंटी कादरी, हरिदास लोमटे, महेश काटे,मन्सूर काझी, शैलेश काळे,रोहित घाटगे,आशिष घाटगे, रोहन घाटगे, चैतन्य कुलकर्णी आदींचे आभार मानले.


 
Top