कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनाचे अर्थसहाय्य डी .बी. टी . प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याद्वारे कळंब तालुक्यातील लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते कि. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अर्थसहाय्य यापुढे डी. बी. टी. प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. 

त्याकरिता या योजनेच्या लाभार्थ्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे तत्काळ जमा करणे आवश्यक आहेत. आधार कार्ड ची स्पष्ट झेरॉक्स,आधार लिक असलेल्या बँक खाते क्रमांकाची स्पष्ट झेरॉक्स ज्यामध्ये खाते क्रमांक स्पष्ट दिसावा,मोबाईल क्रमांक बँक खात्यास लिंक असलेला, आधार कार्डच्या झेरॉक्स वर लिहावा, लाभार्थी प्रकार अपंग/विधवा/दुर्धर/आजार/निराधार / तृतीय पंथी/शेतकरी आत्महत्या / निराधार वृद्ध), लाभार्थी अपंग असेल तर अपंगाचे ऑनलाइन प्रमाणपत्राची स्पष्ट झेरॉक्स, विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्राची स्पष्ट झेरॉक्स, जातीचा प्रवर्ग (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला),शिधापत्रिकेचा प्रकार (पिवळे/केशरी)करिता धाराशिव तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी वरील कागदपत्रे आपले गावचे तलाठी यांचेकडे किवा तहसील कार्यालय, कळंब येथील विशेष सहायक योजना विभागातील कर्मचारी यांचेकडे कार्यालीयीन वेळेत दिनांक 3 जून 2024 पर्यंत जमा करावीत. जे लाभार्थी सदरील कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्याची सर्ववी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार विजय अवधाने, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे  यांनी केले आहे.

 
Top