धाराशिव (प्रतिनिधी)-आरक्षणाचे जनक लोक कल्याणकारी न्यायप्रिय शासनकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज 6 मे रोजी वतीने छत्रपती शाहू महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले.

 यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष  गौरव बागल, संभाजी ब्रिगेडचे आकाश मुंडे, बालाजी पाटील, कुणाल निंबाळकर, अभिजीत सूर्यवंशी, शुभम मुंडे, दादा पांढरे, अमर घोडके, अजय पाटील, नाना लष्करे इत्यादी यावेळी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.


 
Top