धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशन (असो) च्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता माळी (गोरे) यांची तर सचिवपदी मयुर जालनेकर यांची निवड करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशन (असो) च्या जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यासाठी धाराशिव तालुक्यातील येडशी येथील गणेश हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये फेडरेशन (असो) चे मराठवाडा अध्यक्ष गणेश बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष (शहर) कृष्णा डहाळे यांची तर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी विजयकुमार इखे यांची तसेच उमरगा उपाध्यक्षपदी क्षितीज शिरशीकर, संभाजी पोतदार व अजित नाईक यांची तसेच मुख्य उपाध्यक्षपदी संभाजी पोतदार व राघवेंद्र पोतदार यांची तर कोषाध्यक्षपदी सच्चिदानंद पोतदार यांची व जिल्हा संपर्कप्रमुखपदी मनोज चिंतामणी यांची तसेच संघटकपदी राजेश कदम व सहसंघटकपदी श्रीकृष्ण नाईकनवरे यांची तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून विष्णुदास सारडा, मल्हारी ओमासे, सुदाम खाडे, किशोर गोरे, अभिजीत पेडगावकर, अजित नाईक तसेच निवड करण्यात आली आहे. तसेच कायदेविषयक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजी मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी विनोद चिंतामणी व सचिवपदी अनिल पंडित यांची निवड करण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशन (असो) चे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.