धाराशिव (प्रतिनिधी)-श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान दहिफळ ता. कळंब येथील मंदिर परिसरातील  अनधिकृत अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी व अतिक्रमण काढण्यास हलगर्जीपणा करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी श्री शेत्र खंडोबा देवस्थानचे मानकरी पुन्हा एकदा 10 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन 31 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे

श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे दहिफळ येथील ग्रामदैवत असून  या मंदिराला क तीर्थक्षेत्र देवस्थानचा दर्जा आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमण काढावे यासाठी 30 नोव्हेंबर 2023 रोजी  श्री खंडोबा देवतांचे मानकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसले होते. दोन दिवस मरण उपोषण केल्यानंतर   कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत कार्यालय दहिफळ यांनी 1 महिन्याच्या आत अतिक्रमण प्रक्रिया राबवून पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु भूमीवर अभिलेख कार्यालय यांची मोजणी होऊन सहा महिने पूर्ण झाले तरीसुद्धा अतिक्रमांच्या बाबतीत ग्रामपंचायत कार्यालयाने कोणतीही हालचाल केलेली नाही.. फक्त चाल ढकलपणा करण्याचे ग्रामपंचायत कार्यालय करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे तसेच वरिष्ठ कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनींही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ची चंपाषष्ठीला सटीची मोठी यात्रा असते. मंदिर परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे 2022 च्या  यात्रेतील धार्मिक कार्यक्रम करते वेळेस अतिक्रमणामुळे एकच गर्दी होऊन या गर्दीत एक भाविक मृत्यू पावलेला आहे तसेच 2023 च्या यात्रेत दोन भाविक गंभीर जखमी झाली आहे तरीही प्रशासन जागे झालेली नाही तसेच दर रविवारी मंदिरात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात  अतिक्रमणामुळे मंदिरातील पावित्र्य धोक्यात आलेले असून देवस्थानला विकास कामासाठी  गेल्या  वर्षभरापूर्वी निधी ही मंजूर झालेला आहे परंतु अतिक्रमणामुळे तो निधी तसाच पडून  वापस जाण्याची ग्रामस्थांना भीती वाटत आहे. 

त्यामुळे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान परिसरातील अतिक्रमण काढावीत व अतिक्रमण काढण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितावर कडक कारवाई करावी,अन्यथा 10 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून पुन्हा एकदा आमरण बसण्याचा इशारा पांडुरंग मते व देवस्थानचे मानकरी  जयवंत भातलवंडे, पांडुरंग भातलवंडे, सज्जन कोठावळे ,तुकाराम भातलवंडे नारायण ढवळे ,अविनाश पांचाळ ज्ञानदेव खंडागळे आधी सह ग्रामस्थांनी  सह्या करून निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब, माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन  येरमाळा, ग्रामपंचायत कार्यालय दहिफळ यांना माहितीस्तव देण्यात आलेल्या आहेत.  त्यामुळे गेल्या 7 महिन्यापासून अतिक्रमासाठी चालढकल करणारे प्रशासन  पुन्हा उपोषण करण्यासाठी भाग पाडणारे प्रशासन आता तरी जागे होते की नाही असा प्रश्न ग्रामस्थातून एकावयाची येत आहे.

 
Top