धाराशिव (प्रतिनिधी)-महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी सायंकाळी पदयात्रा काढली. या पदयात्रेत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, रिपाइं, लहुजी शक्तीसेना व इतर घटक पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून शहरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांनी सामान्य नागरिकांसह विविध व्यावसायिकांशी संवाद साधला.

महायुतीतील सर्वच पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेला जनतेकडून मिळालेला प्रतिसाद पाठबळ देणारा आणि विजयाचा मार्ग प्रशस्त करणारा होता, असे चित्र होते. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन या आमदार पाटील व महायुतीचे पदाधिकारी यावेळी व्यावसायिक व नागरिकांशी करत होते. चहाची टपरी, किराणा दुकान, मेडिकल, कपड्याचे व्यापारी, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते आदी व्यावसायिकांशी आमदार पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top