धाराशिव (प्रतिनिधी) - देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन होणार आहे. देशात वेगाने हात असलेल्या विकासाची खरी व्याख्या जनतेला कळू लागली आहे. त्यामुळे विकास म्हणजे मोदी आणि महायुतीला मत म्हणजे, मोदींना मत. त्यामुळे मतदारांनी जागरूक राहून फसव्या घोषणा करणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी व लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार पाठविण्यासाठी आपल्याला मतरूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. भूम तालुक्यातील वालवड व पाथरूड येथे उमेदवार अर्चना पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कळंब तालुक्यातील वाटवडा येथे कॉर्नर सभा घेतली. यावेळी गावातील शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्याला पाठींबा व्यक्त करत महायुतीत प्रवेश केला. यात गणेश नागनाथ पवार, आकाश इंगळे, सुमित राऊत, ऋषिकेश राऊत, तेजस राऊत, चैतन्य राऊत, विशल इंगळे, श्रेयस इंगळे, ज्ञानेश्वर राऊत, ज्ञानेश्वर पुंड, उमेश नवगिरे, रंजित टेकाळे, सुयोग करन, अनिके टेकाळे, गणेश राऊत, गुणवंत वेन्जने, उमेश राऊत, प्रशांत नाडे, पंकज इरपतगिरे, सिद्धेश्वर राऊत, गणेश राऊत, शुभम इंगळे यांचा समावेश आहे.


 
Top