तुळजापूर (प्रतिनिधी) -तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी  व कर्मचाऱ्यास शनिवारी रात्री मारहाण प्रकरणी रविवार दि. 27 मे रोजी सर्व कर्मचाऱ्यांनी आरोपीना अटक करा. उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पोलिस सुरक्षा पुरवा. या मागणीसाठी काम आंदोलन सुरु केले होते. आरोपीना लवकर अटक केले जाईल व उपजिल्हा रूग्णालयास पोलिस सुरक्षा दिली जाईल असे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक रविद्र खांडेकर उपस्थित होते. या आंदोलनात पन्नास कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर हे 100 खाटांचे रुग्णालय असून रुग्णालयात रात्री-अपरात्री अपघाताचे रुग्ण, दारु पिऊन पडलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक ऑन ड्युटी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वादविवाद घालतात. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यांच्याकडून कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ले होतात. त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत असतात. दिनांक 25 मे 2024 रोजी अनंत सोपान गोरे कक्षसेवक हे अपघात विभागात रात्रपाळी डयुटीवर होते. सदरील दिवशी काही रुग्ण व नातेवाईकांनी अनंत सोपान गोरे कक्षसेवक यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर मारहाणीत अनंत सोपान गोरे कक्षसेवक यांच्या डोक्याला व मांडीला गंभीर जखम झालेली आहे. त्यांना लाथा बुक्याही घालण्यात आलेल्या असून सदरील कर्मचारी हे आयसीयु मध्ये ॲडमिट आहेत.


 
Top