भूम (प्रतिनिधी)- आरोग्य दूत राहुल घुले हे सौ. कमल भिमराव घुले बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपले विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांनी भूम परंडा वाशी तालुक्यातील वृद्धांना काठी वाटप करण्याचे काम हाती घेतले आहे. भूम तालुक्यातील “आधाराची काठी “ या उपक्रमाअंतर्गत काठी वाटपाचा शुभारंभ पाथरूड येथून डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते केला आहे.

 भूम परांडा वाशी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गरजू रुग्णाच्या हजारो शस्त्रक्रिया मोफत केल्या. आजवर हजारो रुग्णांवर विविध शश्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना डी पी वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. हे सामाजिक उपक्रम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी वृद्धांना आधार म्हणून काठी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पाथरूड येथून करण्यात आला. पाथरूड येथे 250 वृद्धांना काठीचे वाटप करण्यात आले. तसेच आरसोली येथेही काठीचे वाटप करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब मुंढे हे हजर होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अलीम शेख यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादासाहेब मुंढे, सुशीला आडसूळ, सतीश बांगर, दादासाहेब कांबळे, बाळासाहेब मुंढे, सूयाज शेख, सोनम बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

 
Top