परंडा (प्रतिनिधी) - कल्याणसागर समुहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगाव ता. परंडा या विद्यालयाचा मार्च सन 2023-24 इयत्ता 10 वी चा एकूण निकाल 100% लागला असून विशेष प्राविण्यासह (13) विद्यार्थी उत्तीर्ण असून प्रथम श्रेणीत( 09) द्वितीय श्रेणीत (04)विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्यामध्ये कुमारी-मिस्किन रेणूका गणेश - 91.80 %, कुमारी जाधव समिक्षा सतिश - 89.60%, कुमारी-मिस्किन रजनीगंधा बिभीषण - 89. 40%, कुमारी नरसाळे प्रतिक्षा योगेश -89. 40%, कुमारी पोपळे आदिती नितीन - 89. 40%. या  विद्यार्थिनींनी अनुक्रमे विद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.

या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.सुजितसिंह ठाकूर साहेब, सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी,संस्थेचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी ,कल्याणसागर विद्यालय, डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, सरस्वती विद्यालय, पंरंडाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, परंडाचे मुख्याध्यापक किरण गरड संस्थेच्या सर्व पदाधिकारी व डोमगांव - रोसा येथील सर्व ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अंगद लांडगे, दादासाहेब सुरवसे, जाभाऊ शिंदे, सारंगसिंह ठाकुर, वर्गशिक्षक कुंडलिक चव्हाण तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जाधव महादेव, सतीश चौधरी, माळी संतोष आदींचे मार्गदर्शन लाभले.

 
Top