धाराशिव  (प्रतिनिधी)-शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयातील दहावीचा मार्च 2024 चा निकाल 98.09 टक्के लागला आहे. 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन 6 तर 80 टक्के पेक्षा अधिक गुण घेवून 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राघव पाटील या विद्यार्थ्याला संस्कृत मध्ये 100 पैकी शंभर गुण मिळाले आहेत. तर प्रशालेतून प्रथम येण्याचा मान नारायणी श्रीपाद कुलकर्णी हिने 98.80 गुण घेऊन पटकावला आहे. तर स्वप्नील सतीश पाटील याला  96.40 गुणांसह प्रशालेतून द्वीतिय येण्याचा मान मिळाला आहे . राघव महेश पाटील  94.00 टक्के गुण घेऊन प्रशालेतून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यासोबतच चिंतेवार ऋतुजा 92.60 सय्यद मेहराज 90.00 साठे अभिलाषा संजय 90.00असे गुणवान विद्यार्थी ठरले आहेत. या शाळेतील105 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 103विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे शाळेचा निकाल 98.09%लागला आहे.

40 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 42 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 19 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर दोन विद्यार्थी पास झाले आहेत. प्रशालेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, संस्था सदस्य शेषाद्री डांगे, सचिव कमलाकर पाटील, डॉ. अभय शहापूरकर, मुख्याध्यापक डॉक्टर मनीष देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top