धाराशिव (प्रतिनिधी)- सालेगाव ( ता. लोहारा, जि. धाराशिव) येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्राम शंकर दुधभाते (वय 82 वर्षे) यांचे 28 मे 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सालेगाव येथील त्यांचा शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, जावई, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते व इन्फोसिसमधील ग्राफिक डिझायनर, एनिमेटर सचिन दुधभाते यांचे ते वडील होत.

 
Top