धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव ईथिकल कमिटी सदस्य गणेश रानबा वाघमारे यांची मुलगी अनोखी परी हिचा वाढदिवस शासकीय महिला रुग्णालयात बेटी बचाओ बेटी पढाओ,स्त्री भ्रूणहत्या रोखुया,स्त्री जन्माचे स्वागत करुया या सदराखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्त्री जन्माचे स्वागत करुन साजरा करण्यात आला.स्त्री जातीच्या जन्मलेल्या बाळाला कपडे व जन्म दिलेल्या मातेला साडी व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य  देविदास पाठक,प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय नलावडे,रुक्मिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.अभिमान हंगरगेकर, बलभीम कांबळे,उपस्थित होते,देविदास पाठक यांनी मनोगत व्यक्त करतांना अनोखी परीस वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम गेली आठ वर्षे पासुन आपल्या रुग्णालयात मुलीच्या जन्माचे स्वागत करुन साजरा केला जातो,हा आगळा वेगळा कार्यक्रम बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींचा सन्मान होण्यासाठी आदर्शवत सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतो,राज्य व केंद्र शासनाच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या  विविध योजना राबविल्या जात असुन एक मुलगी दोन नात्यांना जोडते,मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमातुन जनजागृती झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.वैद्यकिय अधिक्षक संजय नलावडे यांनी अनोखी परीस शुभेच्छा देत कार्यक्रमाची प्रशंसा केली.रुक्मिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.अभिमान हंगरगेकर यांच्या विवाहाला 35 वर्ष पुर्ण झाली याचेही औचित्य साधुन या कार्यक्रमात अनोखी परीच्या वाढदिवस निमित्ताने स्टाफ मेंबर्स सह उत्कृष्ट रुग्ण सेवा दिल्याबद्दल रुक्मिणी फाऊंडेशन तर्फे सिस्टर कर्मचारी यांना सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले,कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचनाने करण्यात आली.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य देविदास पाठक, सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव ईथिकल कमिटी सदस्य गणेश रानबा वाघमारे,डॉ संजय नलावडे,प्रा.अभिमान हंगरगेकर, संजय गजधने,रऊफ शेख ब्रदर, डॉ.राहुल वाघमारे,बलभीम कांबळे,बाबासाहेब गुळीग,विष्णु घरबुडवे,दिनकर रोकडे,संपतराव शिंदे,सतिश भालेराव,विशाल घरबुडवे,अनोखी परी सह संबोधी गायकवाड,आयुष वाघमारे,अनुष वाघमारे,अनुरथ गजधने,आदित्य गजधने,विराज गजधने,विहास घरबुडवे, रियांश गायकवाड तर रुग्णालयातील रमेश गंगावणे,अभिजीत झाडे,संगिता सिरसाठ,रिबेन भंडारी, संगिता मराठे,मनिषा साळुंखे,गिरीजा परसे,रेखा गवळी,अनिता कोळी,सुनिता तांबे,अश्विनी सोमासे,अश्विनी बांगर,सह वैद्यकीय अधिकारी सिस्टर मावशी कर्मचारी सह इतर उपस्थित होते.शेख रऊफ ब्रदर यांनी “बेटी मॉ का साया बाप का सपना हो तुम  कांटौ के बीच खिलता  हुवा गुलाब हो तुम,तुम बेटी ही नहीं मॉ बाप की जान हो तुम“ या शायरीतुन परीला शुभेच्छा दिल्या.तर रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ सह अन्य इतरांनी मोबाईल द्वारे शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचलन रिबेन भंडारी यांनी तर आभार गणेश रानबा वाघमारे यांनी मानले.

 
Top