धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा साखर कारखाना  प्रशाला तेरणानगर ता. जि. धाराशिव या प्रशालेचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 मध्ये निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत प्रशालेचा निकाल 98.05 % लागला आहे.

वैष्णवी तानाजी लोमटे- 94.60%, कु प्रिया विलास डोलारे- 93.60 %, समाधान नागनाथ कावळे- 92.80 %, शिवम पांडुरंग धोंगडे- 92.40 %, ज्ञानेश्वरी दत्ता गडकर- 90.80 %, अमृता गुणवंत देशमुख- 90.40%. एकूण 154 पैकी 151 विद्यार्थी उत्तीर्ण डिस्टिंगशन 54, प्रथम श्रेणी 56, द्वितीय श्रेणी 37 व उत्तीर्ण श्रेणी 04 या घवघवीत यशा बद्दल सर्व यशस्वी गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे अवसायक घोणसे पाटील, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक संजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top