परंडा (प्रतिनिधी)- परडा येथील चैतन्य यांच्या बायो कोळसा कंपनीला शॉर्टसर्कीटमुळे कोळसा डेपोला भीषण आग लागल्याची घटना बुधवार दि.8 रोजी दुपारच्या दरम्यान घडली.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार परंडा शहरातील मुंगशी रस्ता येथे चैतन्य बायो कोळसा कंपनीला दुपारी प्राथमिक अंदाजे उष्णतेची तीव्रता शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत कंपनीतील मालाचे लाखो रुपयाचे  नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच परंडा न.प.कडून अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. सदरची आग नियंत्रणात आली. सुदैयाने या आगीत कुठलेही जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे.


 
Top