तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आलेल्या दिंडया काल्याच्या कार्यक्रमानंतर आपआपल्या गावी मार्गस्थ झाल्या.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस 4 में पासून प्रारंभ झाला.7 में ला श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे मुख्य काल्याचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी उपस्थित हजेरी किर्तनात हभप शंकर महाराज थोबडे, हभप अतुल महाराज बामणीकर, हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांची किर्तने झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. काल्याच्या किर्तनानंतर दिंडया आपआपल्या गावी मार्गस्थ झाल्या. काल्याच्या कार्यक्रमामुळे श्री नृसिंह यांना उटी लाऊन अलंकार घालण्यात आले होते. श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथील मुख्य कार्याचा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी तेर येथील सतिश पाटील यांच्या घरून काल्याच्या कार्यक्रमाची दहीहंडी पाठविली जाते. ही परंपरा आजही अव्याहतपणे चालू आहे.


 
Top