परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील कुंभेफळ येथे मतदान केंद्रावर दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

मिळालेली माहितीनुसार कुंभेफळ येथे लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना पोलीस हवालदार शंकर डोंगरे हा दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार परीक्षाविधीन अधिकारी गणेश देशमुख यांनी परंडा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षक इज्जपवार व कर्मचाऱ्यांनी कुंभेफळ येथील मतदान केंद्रांवर भेट दिली असता सदर पोलीस कर्मचारी दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे दिसून आले. गोंधळ घालत्याचे चित्रीकरण करून सदर कर्मचाऱ्याची येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top