कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता 10 वी) मध्ये तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब शाळेचा सलग 10 व्या वर्षी 100% निकाल लागला असून, 04 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.01 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.

प्रशालेतून पुढीलप्रमाणे निकाल- चेतन औटी 73.20%, आदित्य कोठावळे 67.80,मुकेश पवार 65.60,वैभव गिरी 64.80,संवाद घोडके 59.20%, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवदत्त गिरी साहेब, संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण साहेब,वै.सा.का.चव्हाण साहेब , लेखाधिकारी सुधीर जाधवर साहेब, मुख्याध्यापक बालाजी जाधवर यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशालेतील विशेष शिक्षक आश्रुबा कोठावळे, श्रीमती सुनिता गुंड, सुनंदा गायकवाड या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top