धाराशिव  (प्रतिनिधी)- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आज सोमवार दिनांक 27 मे रोजी जाहीर झाला. या निकालामध्ये जिल्हा परिषद प्रशाला वडगाव (सि) ता. जि. धाराशिव या शाळेने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल  96.55% असा लागला आहे. 

एस एस सी परीक्षा मार्च 2024 मधील गुणवंत विद्यार्थी अनुक्रमे  शाळेत  प्रथम कु. साक्षी रमाकांत चादरे 91.40%;  कु. प्राची अरविंद चादरे 90.40%;कु. गायत्री अभिमान डोके 89.40%;  कु. जानराव समृद्धी राजेंद्र 87.20%; कु. वाडकर श्रद्धा ज्ञानेश्वर 86.60% ;  मुळे वैभवी मधुकर 85.80%;  मुळे अपेक्षा रघुनाथ 85.60 %; आडगळे रेश्मा बालाजी 82.40 %; गायकवाड गायत्री ज्ञानेश्वर  81.20% या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून शाळेचे एकूण  29 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - 28, विशेष प्राविण्य - 10, प्रथम श्रेणी -10 , द्वितीय श्रेणी - 07 तृत्तीय श्रेणी -01 असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  या सर्व विद्यार्थी  व विद्यार्थिनी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक व शाळेचा सर्व स्टाफ  यांचे अभिनंदन  वडगाव ( सि ) चे भूमीपुत्र तथा शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील,  शाळेचे मुख्याध्यापक नाईकवाडे व्ही एच,  प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गुरुजी विचार मंच आणि समस्त ग्रामस्थ वडगाव (सि) यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.


 
Top