परंडा (प्रतिनिधी) -येथील डि.बी.ए समुह कार्यालय कुर्डूवाडी रोड परंडा येथे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मागासवर्गीय समाजातील इयत्ता दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.

यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभिषन खुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.नवनाथ वाघमोडे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे,  संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष समाधान खुळे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब ओहाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार युवक नेते खय्यूम तुटके, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओव्हाळ, ज्येष्ठ नेते पांडुरंग आप्पा मुसळे, खानापूरचे पोलीस पाटील दिलीप परिहार,  ॲड. दयानंद धेंडे, सामाजिक कार्यकर्ते दाजी मारकड आसु, राजेंद्र बनसोडे, बौधाचार्य महावीर बनसोडे, दत्तात्रय पाटील लोहारा, सिताराम नरोटे, पैलवान मनोज पिंपरकर, रणधीर मिसाळ, नागेश थोरात, स्वप्नील पौळ, समाधान  ओवाळ, सौ शकुंतला जकाते, भारत जाधव, मुद्दू पटेल ,खानापूरचे सरपंच चंद्रकांत परिहार, यांच्यासह  दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनी धम्म संदेश दिलीप परिहार ,ओंकार कुमार बनसोडे, मानसी दिपक चौथमहाल, राहुल सिध्दार्थ उबाळे, सुप्रिया कुमार बनसोडे, यश घनश्याम शिंदे, सांकृत्य बनसोडे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले.

 
Top