धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील खिरणी मळा येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरे कत्तलसाठी आणुन बांधून ठेवलेले आहेत. तेथेच पत्राचे शेडचे बाजुस एका वाहनामध्ये जनावरांची कत्तल करुन विक्रीसाठी मांस भरले असल्याची माहिती पोलिस पथकास मिळाली. पथक धाराशिव शहरातील वैराग नाका येथे येवून अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला. यामध्ये त्यांना 9 गोवंशीय जनावरे, मांस आदी 18 लाख 68 हजार रूपयांचा माल मिळून आला.

सदर छापा कारवाई मध्ये खिरणीमळा धाराशिव येथे राहणारे जाकेर कुरेशी, जलील गफुर कुरेशी यांनी एकुण 9 जनावरे कत्तलीसाठी बांधलेले मिळुन आले. यावर पथकाने थोडे अंतरावर मस्जीदचे समोरील पत्राचे शेडचे बाजूस एक अशोक लिलॅड कंपनीचे वाहन दिसुन आले. त्या वाहनाची पथकाने पाहणी केली. त्यामध्ये जनावरांची कत्तल केलेले मांस मिळून आले. वाहनामध्ये एक इसम दिसला. त्याने त्याचे नाव ईर्शाद सलीम पठाण वय 29 वर्ष, रा. रसुलपुरा धाराशिव असे सांगीतले. त्यास सदर वाहनामधील मांस व मालकाबाबत विचारले असता त्याने सदरचे वाहन व मांस हे असलम असद कुरेशी रा. धाराशिव यांचे असलेबाबत सांगीतले. तसेच सदर ठिकाणावून व इसमाकडून एकुण 9 गोवंशीय जनावरे, मांस, वजनकाटा व वाहनासह असा एकुण 18 लाख 68 हजार किंमतीचे मांस व जनावरे जप्त केले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक  अमोल मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन  धाराशिव शहर पो. ठाणे येथे गुरनं/244/2024 भा.द.वि.सं. कलम 429, 34 महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासदुवे मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सुदर्शन कासार, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, जावेद काझी, औताडे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढागारे, वाहन चालक अरब, भोसले, किंवडे, सह आरसीपी  पथक पोलीस ठाणे धाराशिव पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, घोडके, पोकॉ जमादार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top