तुळजापूर (प्रतिनिधी)- समीक्षा लक्ष्मण निकम ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 93.8 गुण घेऊन मंगरूळ जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे .अगदी लहानपणीच वडील लक्ष्मण निकम हे अपघाताने मयत झाले होते. वडिलांचे छत्र नसतानाही जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती या मुलीने प्रथम क्रमांक पटकावल्याने मंगरूळ परिसरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.


 
Top