तुळजापूर  (प्रतिनिधी)-  यंदा शेतकऱ्यांनी दोन संकटे झेलुन ही शेतकऱ्यांची झोळी रिकामीच असल्याचे स्पष्ट करुन पहिल्या नुकसानीचे अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे  नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगुन तात्काळ पंचनामे करुन तातडीने मदत करा. अन्यथा शेतकऱ्यांसाठी मी रस्त्यावर उतरुन मोर्चा काढुन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशारा माजी मंञी  मधुकर चव्हान यांनी पत्रकार परिषद घेवुन दिला.

यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, यंदाचे वर्ष शेतकऱ्यांवर सातत्याने नैसर्गिकसह अनेक संकटे आले. पण शासकीय मदतीचा हात मात्र मिळालेला नाही. मी आमदार असताना अवकाळी पाऊस होताच तात्काळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तालुक्यात आणुन नुकसान दाखवुन महिन्याचा आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत दिल्याचे यावेळी म्हणाले.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ग्रामीण भागात अतिप्रचंड नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे केले जात नाहीत. निवडणुक इतकेच शेतकऱ्यांना संकटात मदत करणे हे ही तितकेच महत्त्वाचे काम आहे. पण तसे होत नसल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांचे घरे स्लँबचे नाहीत तर पञ्याचे कुड आहेत. हे शासनाने लक्षात  घ्यावे. शेतकरी वादळी वाऱ्यात डोक्यात दगड पडून मयत झाले. गोठे पडले, पञे उडुन गेले, कडबा गंजीचे होत्याच नव्हत्या झाले. शेतकऱ्यांनी भाव येईल म्हणून साठवून ठेवलेले सोयाबीन पत्रे उडाल्याने भिजले. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असुन याचे पंचनामे करुन प्रत्येक नुकसानग्रस्तांना मदतीचा हात शासनाने देणे गेरजेचे आहे. यावेळी अमर मगर, रणजित इंगळे, आनंद जगताप, सुनिल रोचकरी, सुरेश वाले उपस्थितीत होते.


 
Top