कळंब (प्रतिनिधी) - कळंब येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीच्या वतीने दिनांक 28 मे स्वतंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थिती लावली. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कळंब येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनीही अभिवादन अभिवादन केले. 

स्मारक समितीच्या वतीने कळंबचेमाजी नगराध्यक्ष यशवंतराव दशरथ यांनी आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार केला. याप्रसंगी स्मारक समितीचे मकरंद पाटील, प्रकाश  भडंगे, संजय बोंदर, संदीप बावीकर, रवी नरहिरे ,माणिक बोंदर,  संजय जाधवर, शिवाजी गिड्डे, विकास कदम, हर्षद अंबुरे, दत्तात्रय लांडगे, अनिल यादव, किरण फल्ले, राजाभाऊ कोळपे, गजानन मुंडे, अशोक क्षीरसागर, नाना शिंगणापुरे, संताजी वीर, महेश जोशी, अनिल कुलकर्णी, सतीश मडकर, विलास खांडेकर, देशमाने, पुरोहित जोशी यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सावरकर जयंती निमित्त स्मारक समितीच्या वतीने 29 मे रोजी  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते केशवजी उपाध्ये यांचे व्याख्यान स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसर कळंब आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर स्मारक समितीचे मकरंद पाटील यांनी केले आहे.

 
Top