भूम (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख  यांच्या 79  जयंतीनिमित्त  रविवार दि. 26, मे 2024 रोजी सकाळी 11 .00 वाजता पंचायत समिती भूम येथे सर्व पक्षीयच्या वतीने पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास शाळू, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटोळे, शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर, काँग्रेस तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, राष्ट्रवादी ॲड. रामराजे साळुंखे, शिवसेना नेते दिलीप शाळू महाराज, भाजपाचे जेष्ठ नेते आदम शेख, अनिल शेंडगे, भूम कॉग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. सिराज मोगल, विधानसभा युवासेना प्रमुख प्रल्हाद आडागळे, असिफ जमादार, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापूरकर, रामभाऊ नाईकवाडी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, प्रकाश आकरे, अखतर जमादार, गणेश साठे, दिपक मुळे. ॲड. घनश्याम लावंड, संतोष सुपेकर, सोनम बनसोडे, शेरखान पठाण, बापू बाबर, रविंद्र लोमटे, रविंद्र वाघमारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top