वाशी (प्रतिनिधी)-श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,बार्शी संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी या विद्यालयाने एस.एस.सी.(इ 10 वी)  बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षेला 159 विद्यार्थी  बसले होते. विशेष प्राविण्यामध्ये 59, प्रथम श्रेणी 56, द्वितीय श्रेणी 30, पास श्रेणी 8 एकूण 153 परीक्षार्थी पास झाले असून 96.22 टक्के निकाल लागला आहे.

विद्यालयातून  प्रेमराज लक्ष्मण मोराळे 497 गुण 99.40% गुण घेऊन प्रथम क्रमांक भूषविला आहे. अथर्व उमेश चेडे 488 गुण 97.60% द्वितीय क्रमांक तर अनुजा शशिकांत फारणे 483 गुण 96.60% तृतीय क्रमांक  तर 90 टक्के पेक्षा अधिक गुण 20 विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, जॉईन्ट सेक्रेटरी अरुण  देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शालेय समितीचे चेअरमन सुरेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष शिवशंकर चौधरी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. गाढवे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, संस्थेचे सदस्य, विद्यालयातील शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, वार्ताहर, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.


 
Top