परंडा (प्रतिनिधी) -मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील मराठा ओबीसी आरक्षण मागणीसाठी पुन्हा अंतरवली सराटी येथे दि.4 जून पासून आमरण उपोषण सुरू करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जन - जागरण गाव बैठका घेण्यात येत आहेत. या अनुषंगाने परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय मोठ मोठया  16 गावात बैठका शनिवार दि.25 व रविवार दि.26 दोन दिवस घेण्यात आल्या व 4 जून रोजी अंतरवली सराटी येथे मोठयासंख्येने मराठा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले. यास मराठा बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. 

जरांगे पाटील यांची प्रकृती खराब असताना ते मराठा समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत असतील तर आपले देखील कर्तव्य बनते. आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवली सराटी येथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देण्याची गावा गावातून सर्व मराठा समाज बांधवानी एकत्रित येवून अंतरवली सराटी येथे जाण्याची तयारी करावी. 

या करिता आपण जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी जागृती करावी. असे आवाहन सकल मराठा समाज भूम, परंडा, वाशी यांच्या वतीन करण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील शिराळा, लोणी, आसू , पिंपळवाडी - चांदणी, वाकडी, सिरसाव, जवळा (नि.),आनाळा, इनगोदा, वाटेफळ, शेळगाव, तांदुळवाडी, देऊळगाव, डोंजा, मुगाव - कार्ला व सोनारी या गावात बैठक घेण्यात आली.

 
Top