धाराशिव (प्रतिनिधी)-सदोष इंजेक्शन पुरवठा करणाऱ्यांचे सखोल चौकशी करावी. लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असे मत आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवार दि. 3 मे रोजी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

गुरूवार दि. 2 मे रोजी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना परिचारिकांनी इंजेक्शन देताच 15 बालके थंडी, तापाने फणफणले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होतो. लहान मुलांना उलट्या, जुलाब अचानक सुरू झाल्याने नातेवाईक हवालदिल झाले होते. मुलांची स्थिती पाहून नातेवाईकांनी रूग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर रात्री 8.30 च्या दरम्यान डॉक्टारांनी रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी कोणते औषध दिले यांची पाहणी करून थंडी, ताप कमी होण्याचे इंजेक्शन बालकांना दिले. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. नितीन भोसले यांनी बालकालां ॲटिबायोटिक्स व उलटी थांबविण्याचे इंजेक्शन दिले होते. त्यांनतर 18 पैकी 15 बालकांना ताप आणि थंडी वाजून आली. दिलेले इंजेक्शन एफडीएच्या प्रयोग शाळेत तपासणीस पाठविणार असून, सदर इंजेक्शन सील केले आहे असे सांगितले.

गुरूवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर ठाकरे गट शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवार दि. 3 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयास भेट देवून उपस्थित डॉक्टरांबरोबर चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी पुरवठा केलेल्या इंजेक्शनची तपासणी करणे गरजेचे असून, ते सील केले आहे. लहान मुलांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. 


 
Top