धाराशिव (प्रतिनिधी) -छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये गळ्यातील सोन्याचे लॉकेट व महागडा मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक धाराशिव शहरात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये एका इसमास मारहाण करून सोन्याची चैन पळवणारा आरोपी तुळजापूर नाका येथे थांबला आहे. या प्रकरणी पोलिस पथकाने जावून चौकशी केली असता प्रेम उर्फ दाद्या अमर चव्हाण याला ताब्यात घेवून चौकशी केली. मी व माझा मित्र रोहन कबीर गायकवाड रा. इंदिरानगर, धाराशिव यांनी 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लुटल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे 65 हजार रूपये किंमतीचा मोबाईल पण चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी सांजा रोड ब्रीज खाली उभारलेल्या रोहन गायकवाड यास पण ताब्यात घेतले. 

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, ढगारे, चालक लाटे, पोकॉ किंवडे  यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 
Top