कळंब (प्रतिनिधी) - पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी गोविंदपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस आयचे निष्ठावंत अनंतराव साहेबराव घोगरे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ द.चिंचवडे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात संस्थेची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवून संस्थेच्या विस्तारासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सामाजिक उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात संस्थेचे कार्य पोहोचवण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष अनंत घोगरे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवले. अनंत घोगरे यांचे या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top