धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन करून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहिले. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घोष, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, स्वातंत्र्य सैनिक पत्नी उंबरेताई आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी शिवसेनेचे अनिल खोचरे, धनंजय सावंत आदी उपस्थित होते.


 
Top