धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीतील सार्थसत्य येथे 8 व 9 जून 2024 रोजी देव गिरी प्रांत संस्कार भारती समिती दोन दिवशीय सर्वसाधारण सभा ग्रीन लॅन्ड शाळेत संपन्न होणार असून यासाठी पूर्वतयारी नियोजन बैठकीस मार्गदर्शन करण्यास देवगिरी प्रांत संस्कार भारतीचे महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी केले सदर सर्वसाधारण बैठकीस प्रांतातील 20 समितीचे एकूण 150 ते 200 कला साधक उपस्थित राहतील असे देशमुख यांनी सांगितले. विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर भगवत गीता देऊन सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी देवगिरी प्रांत लोक कला विधाप्रमुख डॉ. सतिश महामुनी , प्रांत चित्रकला विधा प्रमुख कलाध्यापक शेषनाथ वाघ, नांदेड समिती जिल्हासचिव सौ. अंजली देशमुख, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा संगीत विधा प्रमुख सुरेश वाघमारे, कलासाधक अनिल मालखरे, महादेव केसकर, सुधीर पवार, सार्थकी वाघ उपस्थित होते. बंगरुळ येथील कलासाधक संगमात विमोचित पद्मश्री बाबा योगेंद्र व राष्ट्रीय सचिव स्व. अमरचंदजी यांच्या चरित्र पुस्तकाचे वितरण महामंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीची सांगता प्रसायदानाने झाली.


 
Top