तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त समितीचे गठण करण्यात आले. अध्यक्षपदी कृष्णा पडूळकर तर उपाध्यक्षपदी वैभव पाडूळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तेर ता. धाराशिव येथील अहिल्याबाई होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान याच बैठकीत नुतून समितीचे गठण करण्यात आले. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा पडूळकर तर उपाध्यक्षपदी वैभव पाडूळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच मिरवणूक प्रमुखपदी तुकाराम पांढरे, अमोल पाडूळे  यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी किरण ठोंबरे, मोन्या खांडेकर, शिवाजी पडळकर, आप्पा पडोळकर, महेश भिसे, गणेश बंडगर, हरि भक्ते, रमाकांत लकडे, नवनाथ पसारे , सचिन देवकते, गणेश कदम,  अमोल खांडेकर, महादेव थोरात, दत्ता पडूळकर,  राजेंद्र कानडे, श्रीधर कोकरे  अखिलेश बंडगर,  रवी खांडेकर  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विविध प्रकारचे समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.


 
Top